शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By वेबदुनिया|

मनिप्लांटने खोलीला द्या नवा लुक

मनिप्लांट ठेवला असेल त्या दिशेकडे अचानकच लक्ष जाते. हवे असल्यास तुम्ही याचे सोनेरी पानांना कापून वेगळे लुक देऊन अधिक आकर्षक बनवू शकता.

प्लांटला एखाद्या कंटेनर, बाटलीत किंवा वॉसमध्ये ठेवले असेल तर त्याचे पाणी प्रत्येक आठवड्याने बदलायला पाहिजे. बाटलीत किंवा कंटेनरमध्ये पाणी पूर्ण वरपर्यंत भरू नये. थोडी जागा रिकामी ठेवणे आवश्यक आहे.

चांगल्या वाढीसाठी आणि पोषणासाठी मातीत खत घालावे आणि रोपांना उन्हात ठेवावे.

या रोपाला आधार देण्यासाठी मॉसस्टिकचा वापर केल्याने वाढ चांगली होऊन सौंदर्य वाढते.

मनिप्लांटच्या पानांना नेहमी स्वच्छ ठेवायला पाहिजे. पानांवर बसलेली धूळ ओल्या कपड्याने पुसावी किंवा स्प्रे करावी.