Festival Posters

सुरक्षित मातृत्व आठवडा विशेष : आईचे दूध बाळासाठी अमृत

Updated: शनिवार, 17 ऑक्टोबर 2020 (10:19 IST)
 
1 बाळाला दूध पाजताना नेहमी आनंदी होऊन दूध पाजावे. राग आलेला असल्यास किंवा तणाव असल्यास बाळाला दूध पाजू नये.
 
2 बाळाला दूध पाजण्यापूर्वी आपल्या स्तनाग्राला स्वच्छ करून घ्या.
 
3 आईचे दूध बाळाला त्याच तापमानात दिले जाते जे शरीराचं तापमान असत. इतर बाहेरच्या दुधाप्रमाणे ह्याला गरम करण्याची गरज नसते. 

4 बाळाला दूध पाजताना मांडी घालून बसावं. नंतर बाळाच्या डोक्याखाली आपले हात ठेवा आणि डोक्याला उंच उचला जेणे करून बाळाला सहजपणे दूध पिता येईल.
 
5 आईचे दूध शुद्ध, ताजे आणि निर्जंतुक असतं. हे बाळाला अनेक आजारापासून वाचवतं.
 
6 शक्य असल्यास आपण स्वतः बसूनच आपल्या मांडीत बाळाला निजवून दूध पाजावे. स्वतः निजून दूध पाजू नये. 
 
7 बाळाला वरच्या म्हणजे बाहेरच्या दुधाची एलर्जी असू शकते पण आईच्या दुधामुळे एलर्जी होण्याची तक्रार होतं नाही. 
 
8 बाळ दूध पीत असताना त्याला हसवू नये. यामुळे याला ठसका लागून नाकात दूध येण्याची शक्यता असते.
 
9 आईच्या दुधानेच बाळाचे भागत असल्यास म्हणजे त्याचे पोट भरात असल्यास त्याला वरचे म्हणजे बाहेरचे दूध देऊ नये.
 
10 आपल्या बाळाची सुरक्षा ही आईची पहिली जवाबदारी असते. म्हणून आपल्या बाळाची सर्वोपरीने चांगल्या प्रकारे काळजी घ्यावी.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

गुलाबाच्या पाकळ्या वापरून घरीच नैसर्गिक लिप बाम बनवा; ओठ अगदी मऊ राहतील

पावसाळ्यात तुमच्या हेल्मेटला दुर्गंधी येत असेल तर, हे सोपे उपाय करून पहा

जातक कथा : ढोलवादक आणि जंगलातील दरोडेखोर

आषाढ महिन्यात 'आखाड तळणे' म्हणजे काय? वैज्ञानिक आणि आरोग्यदायी कारण जाणून घ्या

पावसाळ्यात या ५ भाज्या खरेदी करणे टाळा, आरोग्याच्या समस्या टाळा

पुढील लेख
Show comments