बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

हिवाळ्यात केव्हा बदलावी आणि धुवावी ब्रा

जर आपल्याला हे वाचून हसू येत असलं तरी हे खरं आहे की अनेक स्त्रिया विचार करतात की हिवाळ्यात रोज ब्रा धुतल्याविनाही घालू शकतो कारण या दिवसात घाम फुटत नसल्यामुळे ब्रा धुण्याची गरज भासत नाही. या दिवसात ब्रा घाण होत नाही म्हणून एकापेक्षा अधिक वेळ वापरायला हरकत नाही अशी समजूत आहे. परंतू तज्ज्ञांची यावर काय सल्ला आहे तेही जाणून घ्या:
 
तज्ज्ञांप्रमाणे कोणताही मोसम असला तरी आपले अंडरगारमेंट्स दररोज धुतले पाहिजे. दोन- तीन दिवस एकच कपडे घालणे चूक आहे. याने फंगल इंफेक्शनचा धोका वाढतो ज्यामुळे खाज आणि रॅशेजसह अनेक त्वचा रोग होण्याचा धोका असतो.
 
हिवाळ्यात घाम येत नसला तरी आपल्या अंगावर स्वेटर्ससह अनेक कपडे असल्यामुळे शरीराला वारं लागत नाही. याने शरीरात जिवाणू वाढतात म्हणूनच हिवाळ्यातदेखील अंडरविअर नियमित बदलणे आवश्यक आहे.
 
अनेक स्त्रियांप्रमाणे रोज अंडरगारमेंट्स धुतल्याने याचे इलास्टिक सैल पडतात. हे बरोबर असले तरी यामुळे शरीराला रोगाचे घर होऊ देणेही योग्य नाही. म्हणूनच मोसमात गारवा असला तरी अंडरगारमेंट्स बदलणे योग्य ठरेल.
 
तसेच ब्रेस्टफीडिंग करवणार्‍या स्त्रिया, जिम जाणार्‍या किंवा व्यायाम करणार्‍या स्त्रिया, स्पोर्ट्स खेळणार्‍या स्त्रियांनी तर निश्चितच दररोज ब्रा बदलायला हवी आणि धुतलीदेखील पाहिजे.
 
हे माहीत आहे का?
 
आपल्या शरीरावर एका दिवसात किमान 1 बिलियन डेड स्किनची लेयर्स जमा होत असते म्हणून अंडरवायर ब्रा घालणार्‍या महिलांना हिवाळ्यातदेखील आपली ब्रा धुण्याची गरज असते कारण अशा प्रकारच्या ब्रामध्ये जिवाणू जमा होऊ लागतात. सेंसेटिव्ह स्किन असणार्‍यांनी तर या गोष्टींचे विशेष लक्ष दिले पाहिजे.