रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कथा
Written By
Last Updated : शुक्रवार, 17 मार्च 2023 (12:09 IST)

पुरणपोळीवरुन संसाराच सार, आजीने केललं सुंदर वर्णन

puranpoli recipe
स्त्रीनं अगदी पुरणासारखं असावं...संसाराच्या पोळीत स्वतःला लपेटून घेताना स्वतःची ओळख नी अस्तित्व आवर्जून जपावं.
 
आज्जी म्हणाली, पुरणपोळी म्हणजे सर्व पदार्थाची शान... देवाचा नैवेद्य पुरण असल्याशिवाय पूर्ण मानला जात नाही... त्याच्या नावातच पूर्णत्व आहे... म्हणून सांगते स्त्रीने पुरणासारखं असावं... स्वयंसिद्ध, पूर्ण...पुरणाला जसं वेगवेगळ्या कसोट्या पार कराव्या लागतात.. म्हणजे अगदी डाळ निवडणे, त्यातील अनावश्यक डोळ काढून टाकणे, पाण्यात भिजवणे, खसखस धुणे, शिजवणे अगदी बोटचेपी होईपर्यंत, पुन्हा वाटणं, गूळ/साखरेचं अचूक प्रमाण आणि मग साखर किंवा गुळाचा चटका आणि मग तो चटका नीट बसला आहे की नाही याची शेवटची कसोटी...

स्त्री सुद्धा तिच्या आयुष्यात अशा कितीतरी कसोट्या देत असते... आणि प्रत्येक कसोटीवर खरी उतरून एक कुशल गृहिणी, संसारी स्त्री बनते...
 
मिहिका लक्षपूर्वक आजीचं बोलणं ऐकत होती. आजी पुढे म्हणाली... एकदा का पुरण तयार झालं की मग पोळीची तयारी... अगं आज्जी सगळं स्त्री बद्दलचं बोलत आहेस.. पुरुषांचा काही रोल आहे की नाही संसारात?? मिहीकाने हसत हसत विचारलं... 

आज्जी म्हणाली... आहे तर...पुरणपोळी म्हणजे संसारातील नवरा आणि बायकोचा उत्कृष्ठ मिलाफच आहे समज ना!! कणकेचा गोळा म्हणजे पुरुष गं बाई... गोड गोड पुरणाला आपल्यामध्ये सामावून घेणारा, तिला गरम तव्याच्या चटक्यापासून वाचवणारा, गरम तुपाची धार स्वतःवर घेऊन तिला गुलाबी, सोनेरी रंग बहाल करणारा सुद्धा...
 
संसार पुरणपोळी सारखा असावा... बायको पूरण तर नवरा वरची पोळी... स्त्रीने संसारात स्वतःचं स्वत्व जपावं... पुरणासारखं.. संसाराच्या पोळीमध्ये लपेटलं गेलं तरी.. पुरणपोळीमध्ये जसं आधी नाव पुरणाचंच येतं तशी आपली स्वतःची वेगळी ओळख बनवावी... अगदी संसारात एकरूप होऊन सुद्धा...
 
पुरणपोळीमध्ये पुरण वर दिसत तर नाही पण नाव आणि स्वाद मात्र केवळ पुरणाचाच असतो अगदी तसं... 
संसारातील अनेक कसोट्या अगदी हसत पार पाडाव्यात त्याच बरोबर 
स्वतःच्या अंगातले कलागुण फुलवावेत... केशर, जायफळ, वेलचीचा मंद सुगंध जसा पुरणाला आगळा स्वाद देतो त्याच प्रमाणे आपल्या चांगल्या स्वभावाचा, कर्तृत्वाचा सुगंध सतत बहरू द्यावा.. पुरणात जसं थोडंसं तूप शेवटी घालतो तशीच स्नीग्ध... 
 
बोला अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ..

- सोशल मीडिया