Marathi Biodata Maker
✕

"गोडवा"

Updated: बुधवार, 26 मे 2021 (13:30 IST)
 
सध्या कोरोना काळात कामवाल्या मावशी सुट्टीवर. आता घरातील सर्व कामांची जबाबदारी सुमेधावरच. सकाळपासून आवराआवर, न्याहारी, धुणीभांडी, स्वयंपाक सर्वच कामं आली! हे सर्व उरकून दमायला व्हायचे पण तरी ती लेखनासाठी वेळ काढतंच होती. आजही तिचा एक लेख प्रसिद्ध वर्तमान पत्रात प्रकाशित झाला होता. सकाळपासून शुभेच्छांचे फोन यायला सुरुवात झाली. हातात कधी केरसुणी तर कधी लाटणं आणि फोनवर बोलण्यासाठी कानात हेडफोन लावून ती खिंड लढवत होती. सासूबाई सर्व बघत होत्या. तश्या त्यापण खूप मदत करायच्या. सुमेधाची साहित्य क्षेत्रात झालेली प्रगती त्यांना आवडत नसे असेही नाही पण एकदा लग्न झालं की बायकांनी संसारातंच लक्ष द्यायला हवे, अशी काही त्यांची विचारसरणी होती.
 
घरची सर्व कामं उरकून, मुलांचा ऑनलाईन अभ्यास सांभाळून सुमेधा रात्री एक वाजता लॅपटॉप घेऊन साप्ताहिक सदर टाईप करायला बसली. तेवढ्यात तिला स्वयंपाक घरात काही आवाज आला. जाऊन बघते तर सासूबाई चहा करत होत्या. तिने विचारले, "आई एवढ्या रात्री काय करत आहात?" 
"आता थकल्यावर चहा प्यायची इच्छा झाली तर करणार कोण अन् सांगणार कोणाला?" सासुबाई म्हणाल्या.
 
सुमेधाला जरा वाईटच वाटलं, पण तरी स्वतःला सावरत म्हणाली, "आई चहा प्यायचा असेल तर सांगा न, मी करून देते. त्यात काय?" 
 
"अगं मला नको. मी तुझ्या बद्दल बोलतेय! रात्रीची लिहायला बसलीस, चहा घे. जरा तरतरी येईल. तुम्ही आजकालच्या मुली न! फार जिद्दी..पण खरंच हुशार हं.... घर सांभाळून ही आपले अस्तित्व निर्माण करणे, ते टिकवून ठेवणे आणि स्वतःसाठी वेळ काढणे तुम्हालाच जमतं बाई..! 
घे अन् जास्त जागू नको." हातात चहाचा कप देऊन त्या खोलीत निघून गेल्या.
 
सुमेधाला हा अनपेक्षित हवाहवासा आयता चहा अधिकच गोड लागत होता....

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

बीटेक इन सिरेमिक आणि सिमेंट टेक्नॉलॉजी मध्ये करिअर बनवा, पात्रता, व्याप्ती ,पगार जाणून घ्या

गुडघ्यांचा काळेपणा दूर करायचा आहे? त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनवण्यासाठी करा हे सोपे घरगुती उपाय!

Dhantrayodashi 2026 Wishes in Marathi धनत्रयोदशी शुभेच्छा संदेश मराठी

Kitchen Hacks डाळिंबाचे दाणे दीर्घकाळ ताजे ठेवण्यासाठी या सोप्या पद्धतींचा अवलंब करा

पौराणिक कथा : अहंकार सोडा, नम्र व्हा...गोष्ट देवर्षी नारद आणि वृक्षाची

पुढील लेख
Show comments