वरुथिनी एकादशी व्रत कथा (Varuthini Ekadashi Katha)
भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या विनंतीवर या एकादशी व्रताची कथा आणि महत्त्व सांगितले. त्यांनी सांगितले की प्राचीन काळी रेवा अर्थात नर्मदा नदीच्या काठावर मान्धाता नावाचा अत्यंत परोपकारी व तपस्वी राजा राज्य करीत होता. दानवीर राजा जेव्हा जंगलात तपस्या करत होता तेव्हा जंगली अस्वल आला आणि राजाचा पाय चावू लागला.
तो राजाला खेचून दाट जंगलात घेऊन गेला. तेव्हा राजाने तपस्या धर्माचे पालन करत विचलित न होता प्रभू विष्णूंना प्रार्थना केली.
तपस्वी राजाची प्रार्थना ऐकून प्रभू विष्णू तेथे प्रकट झाले आणि सुदर्शन चक्राने अस्वलाचे वध केले, परंतू तोपर्यंत अस्वलाने राजाचा एक पाय खाल्ला होता. याने राजा मान्धाता खूप दु:खी झाले. श्री हरींनी त्यांच्या वेदना समजून पवित्र नगरी मथुरा जाऊन प्रभूंच्या वराह अवताराची पूजा करण्या सांगितले तसंच वरूथिनी एकादशी व्रत करण्यास सांगितले. या व्रताच्या प्रभावाने पाय बरा होईल असे म्हटले. कारण या पायाची दशा पूर्वजन्मी घडलेल्या गुन्ह्यामुळे झाल्याचे त्यांनी म्हटले.
प्रभू श्रीहरी विष्णुंच्या आज्ञांचे पालन करत राजा पवित्र पावन नगरी मथुरा पोहचले आणि पूर्ण श्रद्धा व भक्तिभावाने व्रत केले ज्यामुळे त्यांनी गमावलेला पाय पुन: प्राप्त झाला.