1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रीरामनवमी
Written By
Last Modified: मंगळवार, 20 एप्रिल 2021 (14:50 IST)

रामनवमी या ‍दिवशी नक्की वाचावी श्रीरामाची पवित्र जन्म कथा

Ramnavami marathi mahiti
रामायण आणि रामचरित मानस पवित्र ग्रंथ आहेत. तुलसीदास यांनी श्री रामाला ईश्वर मानत रामचरितमानसची रचना केली आहे परंतू आदिकवि वाल्मीकि यांनी आपल्या रामायणात श्री राम यांना मनुष्य मानले आहे. तुलसीदास यांची रामचरितमानस रामाच्या राज्यभिषेकानंतर समाप्त होते तर श्री वाल्मीकि यांनी आपल्या रामायणात श्री राम यांचे महाप्रयाण पर्यंत वर्णन केले आहे.
 
महाराज दशरथांनी पुत्र प्राप्तीसाठी यज्ञ सुरू करण्याचा निर्णय घेतला. महाराजांच्या आज्ञानुसार श्यामकर्ण अश्व चतुरंगिनी सेनेसह सोडवण्यात आला. महाराज दशरथ यांनी सर्व मनस्वी, तपस्वी, विद्वान ऋषी-मुनींना व वेदविज्ञ प्रकाण्ड पण्डितांना यज्ञ सम्पन्न करण्यासाठी आमंत्रित केले. योग्य वेळ आल्यावर अभ्यागतांसह महाराज दशरथ आपले गुरु वशिष्ठ आणि आपले परम मित्र अंग देशाचे अधिपती लोभपाद यांचे जामाता ऋंग ऋषींसह यज्ञ मण्डप आले. या प्रकारे महान यज्ञाचे विधीपूर्वक शुभारंभ केले गेले. संपूर्ण वातावरण वेदांच्या ऋचांच्या उच्च स्वरात पाठ उत्स्फूर्त होत असल्याने आणि समिधाच्या सुगंधाने दरवळू लागला.
 
सर्व पंडित, ब्राह्मण, ऋषींना योग्यतेनुसार धन-धान्य, गौ इतर भेट देऊन विदा करत यज्ञ समाप्ति झाली. राजा दशरथ यांनी यज्ञाचा प्रसाद आपल्या महालात जाऊन आपल्या तिन्ही पत्नींना वितरित केला. प्रसाद ग्रहण केल्यानंतर परिणामस्वरुप तिन्ही राण्या गर्भवती झाल्या.
 
जेव्हा चैत्र मासाच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला पुनर्वसु नक्षत्रात सूर्य, मंगळ, शनी, बृहस्पति आणि शुक्र आपआपल्या उच्च स्थानात विराजित होते, तेव्हा कर्क लग्न उदय होताच महाराज दशरथ यांच्या मोठ्या राणी कौशल्या यांच्या गर्भातून एक शिशु जन्माला आला. शिशु नील वर्ण, चुंबकीय आकर्षण, खूप तेजस्वी, परम कान्तिवान आणि अत्यंत सुंदर होता. त्या शिशुकडे बघणारे एकटक लावून त्याकडे बघतच राहयचे. यानंतर शुभ नक्षत्र आणि शुभ घडीत महाराणी कैकेयी यांच्यासह तिसरी राणी रानी सुमित्रा यांनी दोन तेजस्वी पुत्रांना जन्म दिला.
 
संपूर्ण राज्यात आनंद पसरला. महाराज यांच्या घरी चार पुत्रांच्या जन्माच्या उत्साहात गन्धर्व गान करु लागले. अप्सरा नृत्य करु लागल्या. देवता आपल्या विमानातून फुलांचा वर्षाव करु लागले. महाराजांनी उन्मुक्त हस्ताने राजद्वारावर आलेल्या भाट, चारण आणि आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या ब्राह्मण आणि याचकांना दान-दक्षिणा दिली. 
 
पुरस्कार स्वरुप प्रजेला धन-धान्य आणि दरबारात असणार्‍यांना दागिने, रत्न प्रदान केले गेले. चारी पुत्रांचं नामकरण महर्षी वशिष्ठ यांच्याद्वारे केले गेले. त्यांचे नाव रामचन्द्र, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न असे ठेवले गेले.
 
जसं जसं वय वाढत गेलं रामचन्द्र गुणांमध्ये आपल्या भावांपेक्षा प्रगती करत राहिले आणि प्रजेत लोकप्रिय होऊ लागले. ते अत्यंत विलक्षण प्रतिभेचे धनी होते परिणामस्वरूप अल्प काळातच सर्व विषयांत पारंगत झाले. ते सर्व प्रकाराच्या अस्त्र-शस्त्र हाताळणे आणि हत्ती-अश्व यांसह सर्व प्रकाराच्या वाहनांवर स्वारी करण्यात निपुण झाले. ते 
 
सततमाता-पिता आणि गुरुजनांच्या सेवेत असायचे. त्यांचे तिघं भाऊ देखील त्यांच अनुसरण करायचे. चारी भावांमध्ये गुरुंबद्दल आदर व श्रद्धा होती. चारी भावडांमध्ये प्रेम आणि सन्मानाची भावान देखील होती. चारही मुलांना पाहून महाराज दशरथ मनापासून अभिमानाने व आनंदाने भरुन जात असे.