मंगळवार, 28 मार्च 2023
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रीरामनवमी
Written By
Last Updated: मंगळवार, 20 एप्रिल 2021 (13:11 IST)

भगवान रामाच्या पायात असे हे आश्चर्यकारक चिन्हे, जाणून आपणास आश्चर्य होईल

श्रीरामचरित मानसामध्ये गोस्वामी तुलसीदास यांनी प्रामुख्याने श्रीरामाच्या पायात 5 अश्या शुभ चिन्हांचे - ध्वज, वज्र,अंकुश, कमळ आणि उभ्या(अनुलंब) रेषांचे वर्णन केले आहेत. इतर पवित्र ग्रंथ एकत्र करून बघितल्यावर एकूण 48 पवित्र चिन्ह आढळतात. दक्षिणी पायात 24 चिन्हे तर डाव्या पायात 24 चिन्हे आहेत. विशेष म्हणजे जे चिन्ह श्रीरामांच्या दक्षिण पायात आहे तेच भगवती देवी सीतेच्या डाव्या पायात आहे. आणि जे चिन्ह श्रीरामाच्या डाव्या पायात आहे ते सीतेच्या दक्षिणी पायात आहे. सर्वप्रथम आपण श्रीरामाच्या दक्षिण पायातील शुभ चिन्हे जाणून घेऊ या-
1 अनुलंब रेषा : याचा गुलाबी रंग आहे. सनक, सनंदन,सनतकुमार आणि सनातन हे अवतार आहेत. जे या चिन्हाचा ध्यान करतात, त्यांना महायोगाची सिद्धी प्राप्त होते आणि ते या भवसागरातून पार होतात.
2 स्वस्तिक : हे पिवळ्या रंगाचे आहे. याचा अवतार श्रीनारदजी आहे. हे शुभदायक आणि कल्याणकारी आहे. या चिन्हाचा ध्यान करणाऱ्यांचे  नेहमी मंगळ आणि कल्याण होतात. 
3 अष्टकोण : हे लाल आणि पांढऱ्या रंगाचे आहे. हे यंत्र आहे. याचे अवतार श्री कपिलदेवजी आहे. जे कोणी या चिन्हाचे ध्यान करत, त्यांना अष्ट सिद्धी उपलब्ध होतात.
4 श्री लक्ष्मीजी : यांचा रंग अरुणोदयकाळाच्या लालिमा सम आहे. ते खूपच सुंदर आहेत. याचा अवतार साक्षात देवी लक्ष्मीचं आहे जे लोक या चिन्हाचे ध्यान करतात, त्यांना समृद्धता, ऐश्वर्य प्राप्ती होते.
5 नांगर : हे पांढऱ्या रंगाचे आहे. याचा अवतार बलरामाचे नांगर आहे.हे विजय मिळवून देणारे आहेत. जे लोक या चिन्हांचा ध्यान करतात, त्यांना शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होते. 
6 मुसळ : याचा रंग राखाडी आहे. अवतार मुसळाचे आहे. जे लोक या चिन्हाचे ध्यान करतात, त्यांचा शत्रूंचा नायनाट होतो.
7 साप (शेष) : याचा रंग पांढरा असून हे शेषनागाचे अवतार आहे. जे या चिन्हाचा ध्यान करतात, त्यांना देवाची भक्ती आणि शांती मिळते.
8 बाण : याचा रंग पांढरा, पिवळा, गुलाबी आणि हिरवा आहे. याचे अवतार बाण आहे. या चिन्हाचे ध्यान करणाऱ्यांच्या शत्रूंचा नायनाट होतो.
9 अंबर(कापडं) : याचा रंग निळसर आणि विजेचा आहे. याचे अवतार वराह देव आहे. जे या चिन्हाचा ध्यान करतात, त्याची भीती दूर होते. 
10 कमळ : याचा रंग गुलाबी आहे. याचा अवतार विष्णू-कमळ आहे. या चिन्हाचा ध्यान करणाऱ्याच्या यशात वाढ होते आणि मन आनंदित होते. 
11 रथ : हे चार घोडांचे असत. हे बरेच रंगाचे असतात. घोड्यांचा रंग पांढरा आहे. अवतार पुष्पक विमान आहे. जे या चिन्हाचा ध्यान करतात, त्यांना विशेष सामर्थ्य मिळतं.
12 वज्र : याचा रंग विजेच्या रंगाप्रमाणे असत. याचा अवतार इंद्र आहे. जे या चिन्हाचा ध्यान करतात, त्यांचे सर्व 'पाप नाहीसे होतात आणि सामर्थ्य मिळतं.
13 यव : याचा रंग पांढरा आहे. अवतार कुबेर आहे. यापासून सर्व यज्ञ उद्भवतात. याचे ध्यान करून मोक्षाची प्राप्ती होते, पाप नाहीसे होतात. हे सिद्धी, विद्या, सुमती आणि संपत्तीचे निवासस्थळ आहे.
14 कल्पवृक्ष : याचा रंग हिरवा आहे. अवतार कल्पवृक्ष आहे. जे या चिन्हाचा ध्यान करतो, त्याला धर्म,अर्थ,काम आणि मोक्ष प्राप्त होतो आणि सर्व इच्छा पूर्ण होतात.
15 अंकुश : ह्याचा रंग काळा आहे. याचा ध्यान करणाऱ्याला दिव्य ज्ञान प्राप्त होतो. सांसारिक मळाचा नाश होऊन मनावर नियंत्रण करणं शक्य होतो.
16 झेंडा(ध्वज) : याचा रंग लाल आहे. याला विचित्र वर्ण देखील म्हणतात. ह्याचा ध्यान केल्याने विजय आणि कीर्ती प्राप्त होते. 
17 मुकुट : याचा रंग सोनेरी आहे. अवतार दिव्यभूषण आहे. ध्यान करणाऱ्यांना उच्च स्थळ प्राप्त होतो.
18 चक्र : याचा रंग तापवलेल्या सोन्यासारखे आहे. अवतार सुदर्शन चक्राचे आहेत. ध्यान करणाऱ्याचे सर्व शत्रू नाहीसे होतात.
19 सिंहासन : याचा रंग सोनेरी असून अवतार श्रीरामाचे सिंहासन आहे. ध्यान करणाऱ्यांना विजय आणि आदर प्राप्ती होते.
20 यमदंड : रंग कांस्याचे असून अवतार धर्मराज आहे. चिन्हाचा ध्यान करणाऱ्यांना यम चा त्रास होत नाही आणि निर्भयता प्राप्त होते. 
21  चामर : याचा रंग पांढरा आहे. अवतारीदेव श्रीहयग्रीव आहे. याचा ध्यान करणाऱ्यांना राज्य आणि सम्पन्नता मिळते. ध्यान केल्याने निर्मळता येते सर्व विकार नष्ट होतात आणि चंद्राच्या कला सारखे प्रकाश उत्पन्न होतो. 
22 छत्र : रंग चमकदार धवल रंगाचे असून अवतार कल्की आहे. या चिन्हाचा ध्यान करणाऱ्याला राज्य आणि संपन्नता मिळते. शारीरिक, दैवीय, भौतिक तापापासून त्यांचे संरक्षण होते आणि मनात दयाभाव जागृत होतो.  
23 नर (पुरुष) : रंग गौर (गोरा) आहे. अवतार दत्तात्रेय आहेत. याचा ध्यान केल्याने भक्ती, शांती आणि सत्त्व गुणांची प्राप्ती होते.
24 जयमाळा : हे विजेच्या रंगाचे आहे किंवा ह्याला चित्र-विचित्र रंगाचे देखील म्हटले जाते. याचा ध्यान करणाऱ्यांना भग्वद विग्रह च्या शृंगार आणि उत्सवा मध्ये प्रेम वाढत.
 
भगवान श्रीरामाचे डाव्या पायातील शुभ चिन्हं -
1 शरयू : याचा रंग पांढरा असून अवतार विरजा -गंगा इत्यादी आहेत. या चिन्हाच्या ध्यान करणाऱ्यांना भगवान श्रीरामाची भक्ती प्राप्त होते आणि काळी मुळाचा नाश होतो. 
2 गोपदं : याचा रंग पांढरा आणि लाल आहे. अवतार कामधेनू आहे. ह्याचा ध्यान करणाऱ्यांना पुण्य, भग्वद भक्ती आणि मुक्तीचे अधिकार मिळतात. 
3 पृथ्वी : याचा रंग पिवळा आणि लाल असून अवतार कमठाचे आहेत. ह्याचा ध्यान करणाऱ्याचा मनात क्षमा भाव वाढतो. 
4 कलश :  हे सोनेरी आणि काळ्या रंगाचे आहे याला श्वेत म्हणजे पांढरा म्हणतात. अवतार अमृत आहे. ह्याचा ध्यान करणाऱ्याला भक्ती, जीवनापासून मुक्ती आणि अमरत्व प्राप्त होतो. 
5 पताका : याचे रंग विचित्र असून ह्याचा ध्यानाने मन पवित्र होतो. ध्वजा चिन्हाने कळीचे भय नाहीसे होतात.   
6 जांभळाचे फळ : याचा रंग काळा आहे. अवतार गरूड आहे. हे मंगलदायी असतात. ह्याचा ध्यान करणाऱ्यांना अर्थ, काम, मोक्षाची प्राप्ती होते. 
7 अर्धचंद्र : रंग उजळ असून अवतार वामन आहे. ह्याचा ध्यान करणाऱ्यांचे मनातील दोष दूर होतात, सर्व ताप नष्ट होतात, प्रेम वाढतं, भक्ती, शांतता आणि प्रकाशाची प्राप्ती होते. 
8  शंख : रंग लाल आणि पांढरा आहे. अवतार वेद, हंस, शंख, इत्यादी आहेत. ह्याचा ध्यान केल्याने कपट, छळ, आणि मोहातून सुटका होते. विजय मिळते बुद्धिमत्तेत वाढ होते. हे अनाहत- अनहद नादाचे कारणीभूत असतात.
9  षट्कोण : याचा रंग पांढरा आणि लाल आहे. अवतार श्री कार्तिकेय आहेत. ह्याचा ध्यान करणाऱ्यांना त्यांच्या षट्विकार - काम, क्रोध, मत्सर, लोभ मोह नाहीसे होतात. हे यंत्ररूपी आहेत. याचे ध्यान षट्संपत्ति- शम, दम, उपरति, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधानाचे प्रदाता आहे .
10 त्रिकोण : हे यंत्राचे रूप आहेत रंग लाल असून अवतार परशुराम आणि हयग्रीव आहेत. ह्याचा ध्यान केल्याने योगाची प्राप्ती होते.
11 गदा : रंग काळा आहे. अवतार महाकाळी आणि गदा आहे. ह्याचा ध्यान केल्याने विजय मिळते आणि दुष्टांचा नायनाट होतो.
12 जीवात्मा : रंग प्रकाशी हलकं असून अवतार जीव आहे. ह्याचा ध्यान केल्याने शुद्धता वाढते.
13 बिंदू : रंग पिवळा आणि अवतार सूर्य आणि माया आहे. ह्याचा ध्यान करणाऱ्यांच्या वशमध्ये देव येतात सर्व पुरुषार्थ सिद्ध होतात. पाप नाहीसे होतात. याचे स्थळ अंगठा आहे. 
14 शक्ती : हा (श्वाम-सित-रक्त) काळपट रक्ताच्या रंगाचा आहे. याला लाल,गुलाबी आणि पिवळा देखील म्हणतात.अवतार मूळ स्वरूप शारदा आणि महामाया आहे. ह्याचा ध्यान केल्याने श्री-शोभा आणि संपत्ती मिळते.
15 सुधा कुंड : याचा रंग पांढरा आणि लाल आहे.  ह्याचा ध्यान केल्याने अमरत्व मिळत.
16 त्रिवली : हा तीन रंगाचा हिरवा,लाल आणि पांढरा असतो. अवतार वामन आहे. चिन्हं वेद रूप आहे.  ह्याचा ध्यान करणाऱ्यांना कर्म, उपासना आणि ज्ञानाने संपन्न होऊन भक्तिरसाला उपभोगण्याचे पात्र असतात. 
17 मीन : रंग उजळ आणि चंदेरी असतो. हा कामाचा ध्वज आहे, मोहक आहे,  ह्याचा ध्यान करणाऱ्यांना भगवंतांच्या प्रति प्रेमभाव मिळतो.
18 पूर्ण चंद्र : रंग पूर्णपणे पांढरा असून अवतार चंद्रमा आहे. ह्याचा ध्यान केल्याने मोहरूपी तम,आणि त्रितापांचा नाश होऊन मानसिक शांती, साधेपणा,आणि प्रकाशात वाढ होते.
19 वीणा : याचा रंग पिवळा,लाल आणि पांढरा आहे अवतार नारदजी आहे.  ह्याचा ध्यान केल्याने राग- रागिणीमध्ये प्रभुत्व मिळतं आणि भगवंतांच्या यशोगाण्यात यश मिळतं.
20 वंशी (वेणू) रंग वेगळाच असून अवतार महानाद आहे. ह्याचा ध्यान केल्याने गोड शब्दांनी मनाला मोहित करण्यास यश मिळतं.
21 धनुष्य : रंग हिरवा,पिवळा आणि लाल आहे. अवतार पिनाक आणि शार्ङ्ग आहे. ह्याचा ध्यान केल्याने मृत्युभयाचे निवारण करतं आणि शत्रूंना नाहीसे करतो.
22 तूणीर : हे वेगळ्याच रंगाचे असून अवतार श्री परशुराम आहे. ह्याचे ध्यान केल्याने भगवंतांच्या प्रति सख्य रस वाढतो. ध्यानाचे फळ म्हणजे सप्तभूमी ज्ञान असे. 
23 हंस : ह्याचा रंग पांढरा आणि गुलाबी आणि सर्व रंगाचा आहे. अवतार हंसावतार आहे. ह्याचा ध्यानाने ज्ञान आणि विवेक वाढतं. संतांसाठीह्याचे ध्यान करणं सुखद असत. 
24 चंद्रिका : रंग पांढरा, पिवळा आणि लाल आहे. ह्याचा ध्यान केल्याने प्रसिद्धी मिळते.
अशा प्रकारे भगच्चरणारविन्दा चे सर्व चिन्ह मंगल करणारे आहे.भक्त श्री भारतेंदु हरिश्चंद्र यांनी देखील रामाच्या 48 पाय चिन्हांचे वर्णन आपल्या काव्यात केले आहे आणि म्हटले आहेत की श्री रामाचे उजव्या पायाची चिन्हे ते सीतेच्या डाव्या पायात आहेत आणि जे चिन्हे श्रीरामाच्या डाव्या पायात आहे ते सीतेच्या उजव्या पायात आहेत. 
 
ही चिन्हे सर्व व्यक्तिमत्त्व ऐश्वर्य आणि भक्ती -मुक्तीचे अक्षय कोश आहेत. ज्यांना भगवान श्रीरामाचे चरण कमळातील या चिन्हाचे ध्यान करण्याची आवड असल्यास त्याचे जीवन पुण्याई, धन्य, यशस्वी आणि सार्थक आहेत. भगवंताच्या चरणविंदाची स्त्री त्यांचा चिन्हांच्या कल्याणकारी सन्मानाने समन्वित आहे. हे चिन्हं संत महात्मांच्या आणि भक्तांसाठी संरक्षक आणि उपयुक्त आहेत. भक्तमाळ मध्ये महात्मा नाभादासजींनी हे अधोरेखित केले आहे.
 
सीतापति पद नित बसत एते मंगलदायका।
चरण चिह्न रघुबीर के संतन सदा सहायका।।