1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
  4. black forest

व्हॅलेंनटाईन डे स्पेशल : ब्लॅक फॉरेस्ट केक

ब्लॅक फॉरेस्ट केक
साहित्य : दीड वाटी मैदा, सवा वाटी साखर, अर्धी वाटी दूध, अर्धी वाटी दही, अर्धी वाटी तेल, एक अण्डा, 1 चमचा सोडा, 1 चमचा कोको, पाव चमचा मीठ, काजू-बदामाचे काप, इसेंस.

कृती : मैदा, साखर व सोडा एकत्र करून चाळून घ्यावे. एका भांड्यात तेल व दही घालून अण्डे फोडून घालावे. त्यात मैदा, साखरेचे मिश्रण थोडे-थोडें टाकून एक सारखे हलवत राहवे.

दूध गरम करून त्यात घालावे. ‍मीठ, इसेन्स, कोको घालून मिश्रण हलवावे. काजू-बादामाचे काप घालून मिश्रण एक सारखे करून घ्यावे. केकच्या भांड्याला तेलाचा किंवा लोण्याचा हात लावून मिश्रण त्यात घालून ते गरम झालेल्या ओव्हनमध्ये ठेवून केक भाजून घ्यावा.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा