तिळगुळाची स्वादिष्ट पोळी
सारणासाठी साहित्य : 2कप गूळ, 2 चमचे बेसन, 1 चमचा भाजलेली खसखस, 1/2 वाटी तिळाचा भुरा, 2 चमचे खवलेलं ओलं खोबरं.
परीसाठी साहित्य : 3 कप कणीक, 1/2 कप मैदा, 2 चमचे साजुक तूप, तेलाचे मोहन, चिमूटभर मीठ. सर्व एकत्र करून पाण्याने घट्ट भिजवावे.
कृती : सर्वप्रथम कढईत तूप घालून बेसन भाजून घ्यावे. नंतर त्यात किसलेला गूळ, तिळाचा भुरा आणि खोबरे घालून एकत्र करून घ्यावे. भिजवलेली कणीक चांगली मऊ मळून घ्यावी. पेढे एवढा गोळा घेऊन त्यात सारण भरून पुरण पोळी करतो त्याप्रमाणे तांदळाच्या पिठीवर पातळ पोळी लाटावी. व तूप लावून खमंग भाजून घ्यावी.