नाताळ विशेष रेसिपी Pineapple Cake
साहित्य-
मैदा - १.५ कप
पिठी साखर - १/४ कप
बटर- १/२ कप
दूध - १/२ कप
अननसाचे इसेन्स - १ चमचा
बेकिंग पावडर - १.५ चमचे
बेकिंग सोडा - १/२ चमचा
अननसाचा रस - १/२ कप
अननसाचे तुकडे - १/२ कप
व्हीप्ड क्रीम
चेरी/सिल्व्हर बॉल्स
कृती-
सर्वात आधी एका बाऊलमध्ये, बटर आणि साखर मिश्रण हलके आणि मऊ होईपर्यंत नीट फेटून घ्या. आता मिश्रणात दूध आणि अननसाचे इसेन्स घाला. आता मैदा, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा चाळणीतून चाळून घ्या. हळूहळू हे ओल्या मिश्रणात घाला. आता अननसाचा रस आणि चिरलेला अननस घाला. हळूवारपणे मिसळा. आता तयार केक टिनला ग्रीस करा आणि त्यात बॅटर घाला. १८०°C वर प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये ३५-४० मिनिटे बेक करा. टूथपिकने तपासा; जर ते स्वच्छ आले तर केक तयार आहे. केक पूर्णपणे थंड होऊ द्या. व्हीप्ड क्रीम, अननसाचे तुकडे आणि चेरीने सजवा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik