उद्या, २२ जानेवारी २०२६ रोजी माघी गणेश जयंती आहे. गणपती बाप्पाचा जन्मदिवस असल्यामुळे या दिवशी घराघरात उत्साहाचे वातावरण असते. बाप्पाला प्रिय असलेल्या नैवेद्याशिवाय हा सण अपूर्ण आहे. तसेच गणेश जयंतीनिमित्त बाप्पाला अर्पण करण्यासाठी काही पारंपारिक आणि खास पाककृती आपण आज पाहणार आहोत.
१. उकडीचे मोदक
बाप्पाचा सर्वात आवडता पदार्थ! माघी गणेश जयंतीला उकडीचे मोदक बनवण्याची जुनी परंपरा आहे.
सारण-ओला नारळ (खवलेला), गूळ, वेलची पूड आणि थोडे जायफळ.
उकड-तांदळाचे पीठ, पाणी, चिमूटभर मीठ आणि थोडे तूप.
टीप-मोदक वाफवताना चाळणीला थोडे तूप किंवा केळीचे पान लावावे, जेणेकरून मोदक चिकटणार नाहीत. वरून साजूक तुपाची धार सोडून बाप्पाला नैवेद्य दाखवावा.
२. तळणीचे मोदक
अनेकांना उकडीचे मोदक बनवणे कठीण वाटते, त्यांच्यासाठी हा उत्तम आणि कुरकुरीत पर्याय आहे.
साहित्य- गव्हाचे पीठ किंवा मैदा (कणकेसाठी), आणि उकडीच्या मोदकाप्रमाणेच नारळ-गुळाचे सारण.
तसेच हे मोदक जास्त काळ टिकतात आणि प्रवासात न्यायलाही सोपे असतात.
नैवेद्याच्या ताटात पंचामृताला विशेष स्थान असते. हे पाच मुख्य पदार्थांपासून बनवले जाते.
साहित्य-दही, दूध, मध, साखर आणि तूप.
हे केवळ चवीलाच नाही तर आरोग्यासाठीही उत्तम मानले जाते. पूजेच्या वेळी देवाला अभिषेक करण्यासाठी आणि नंतर प्रसाद म्हणून याचा वापर होतो.
४. मुगाच्या डाळीची खिचडी
अनेक ठिकाणी गणेश जयंतीला सात्विक नैवेद्य म्हणून मऊ खिचडी आणि सोलकढीचा बेत केला जातो.
साहित्य-तांदूळ, पिवळी मुगाची डाळ, जिरे, हिंग, हळद आणि भरपूर तूप.
ही खिचडी मसाला विरहित आणि पचायला हलकी असते, जी बाप्पाला प्रिय मानली जाते.
नैवेद्याच्या ताटाची योग्य मांडणी
बाप्पाच्या नैवेद्याच्या ताटात मोदक, पंचामृत, एखादी पालेभाजी, वरण-भात वरती तूप आणि लिंबू, आणि पुरणपोळी असावी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik