मंगळवार, 4 नोव्हेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By

होळी विशेष रेसिपी Sugar Free काजू कतली

kaju katli
होळीच्या विशेष सणासाठी खास शुगर फ्री काजू कतली रेसिपी बनवा. आपल्याला नक्की आवडेल. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. 
 
साहित्य- 1 कप काजू पूड केलेले, 5-6 मोठे चमचे शुगरफ्री पावडर,4-5 केसरच्या कांड्या,पाणी गरजेप्रमाणे, 1/2 चमचा वेलची पूड, चांदीचा वर्ख.
 
कृती- सर्वप्रथम एका कढईत पाणी ,केसर कांड्या,शुगर फ्री घालून ढवळा,वेलची पूड घालून घोळ घट्ट झाल्यावर थोडं थोडं काजूपूड घालून सतत ढवळत राहा जेणे करून गाठी होऊ नये.मंद गॅस वर शिजवा.
तयार मिश्रण थंड होण्यासाठी ठेवा. मिश्रण थंड झाल्यावर एका पसरत ताटलीत तुपाचा हात लावून मिश्रण एक सारखे पसरवून द्या. वरून चांदीचा वर्ख लावा. आवडीनुसार सुरीच्या साहाय्याने काजू कतली कापून घ्या.घरात तयार केलेली शुगर फ्री देवाला नैवेद्य दाखवून सर्व्ह करा.