Dharma Sangrah
✕

नवरात्रीत देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी बनवा घरगुती पेढे; मोजक्या साहित्यात सोपी रेसिपी

Updated: मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026 (14:55 IST)
साहित्य-
मिल्क पावडर – २ कप
दूध – ½ कप (कोमट)
तूप – २ ते ३ मोठे चमचे
पिठीसाखर – ½ कप (आवडीनुसार कमी-जास्त करू शकता)
वेलची पूड – ½ छोटा चमचा
केशर – ८ ते १० काड्या (२ चमचे कोमट पाण्यात/दूधात भिजवलेल्या)
पिस्त्याचे काप – सजवटीसाठी
ALSO READ: Sweet Potato Halwa रताळ्याचा शिरा
कृती-
एका कढईत (गॅस सुरू न करता) दूध, तूप आणि मिल्क पावडर एकत्र घ्या. चमचाच्या साह्याने हे मिश्रण नीट मिक्स करून घ्या, जेणेकरून त्यात गुठळ्या राहणार नाहीत. आता कढई मंद आचेवर गॅसवर ठेवा. मिश्रण सतत ढवळत राहा. २ ते ३ मिनिटांत मिश्रण घट्ट होऊन कढई सोडायला सुरुवात करेल आणि गोळा तयार होईल. यात भिजवलेले केशर घालून एकत्र करा. मिश्रण पॅन सोडायला लागले की गॅस बंद करा. हे मिश्रण एका ताटात काढून थोडे कोमट होऊ द्या (पूर्ण थंड करू नका).मिश्रण कोमट असतानाच त्यात पिठीसाखर आणि वेलची पूड घालून हाताने नीट मळून घ्या. (गरम मिश्रणात साखर घातल्यास ते पातळ होईल, त्यामुळे कोमट झाल्यावरच साखर घाला). हाताला थोडे तूप लावून मिश्रणाचे लहान-लहान गोळे करा आणि पेढ्याचा आकार द्या. मधोमध अंगठ्याने हलका दाब देऊन वरून पिस्त्याचे काप लावा.चला तर मऊ आणि स्वादिष्ट केशर पेढे देवीच्या नैवेद्यासाठी तयार आहेत!
ALSO READ: नवरात्री विशेष उपवासाचा जाळीदार डोसा आणि ओल्या नारळाची चटणी पाककृती
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: नवरात्रोत्सव विशेष : उपवास थालीपीठ सोबत सर्व्ह करा पेरूची चटणी

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

हिवाळ्यात वजन झपाट्याने वाढत आहे का? शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज ही योगासने करा

नैतिक कथा : अति लोभ...माश्या आणि मधाची गोष्ट

तुळशीच्या झाडावरील कीड घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय

हिवाळ्याच्या संध्याकाळी ५ पौष्टिक भाज्यांचे सूप बनवा, चवीसोबतच आरोग्याचीही काळजी घ्या

वजन कमी करण्याचा सर्वात सोपा मंत्र; प्रत्येक जेवणानंतर केवळ १० मिनिटे पायी चाला

पुढील लेख
Show comments