शुक्रवार, 10 ऑक्टोबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By

Karwa Chauth 2025 Special मावा बर्फी पाककृती

Mawa-Barfi-Recipe
शुक्रवारी करवा चौथ साजरे केले जाणार आहे. या खास सणाच्या दिवशी तुम्ही नक्कीच नैवेद्यात गोड पदार्थ बनवू शकता. बनायला सोपी आणि चवीला स्वादिष्ट अशी मावा बर्फी ही एक पारंपरिक भारतीय मिठाई आहे जी या दिवशी नक्कीच बनवू शकतात.
साहित्य-
मावा- २५० ग्रॅम
साखर- १५० ग्रॅम
दूध - तीन चमचे
तूप- दोन चमचे
वेलची पूड- अर्धा चमचा
काजू
बादाम
पिस्ता
केशर-दूधात भिजवलेले
कृती-
सर्वात आधी माव्याला मध्यम आचेवर नॉन-स्टिक पॅनमध्ये तूप टाकून हलके भाजून घ्या. यामुळे माव्याचा कच्चा वास निघून जाईल. सतत हलवत रहा जेणेकरून मावा जळणार नाही. भाजलेल्या माव्यात साखर घाला. साखर मिसळल्यानंतर मिश्रण पातळ होईल. मध्यम आचेवर सतत हलवत रहा.
जर मिश्रण खूप कोरडे वाटले, तर तीन चमचे दूध घाला. आता वेलची पूड आणि भिजवलेले केशर घाला. मिश्रण चांगले मिसळा. मिश्रण जेव्हा घट्ट होऊन पॅनच्या बाजूंना सोडू लागेल, तेव्हा गॅस बंद करा.
एका तूप लावलेल्या ट्रे मध्ये मिश्रण पसरवा. त्यावर हलके दाब देऊन सपाट करा. वरून बारीक चिरलेले काजू, बादाम किंवा पिस्ता गार्निश करा. मिश्रण थंड झाल्यावर चाकूने इच्छित आकारात वड्या कापून घ्या. तर चला तयार आहे आपली मावा बर्फी रेसिपी. ही मावा बर्फी सर्वांना आवडेल.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik