Daily Horoscope
✕

दुकानातील मिठाई आणणे टाळा! घरीच बेसन वापरून १० मिनिटात मोतीचूर लाडू बनवा

Updated: बुधवार, 16 सप्टेंबर 2026 (12:09 IST)
साहित्य:
बारीक बेसन – १ कप
साखर – ३/४ कप
पाणी – १/२ कप (पाकसाठी) + आवश्यकतेनुसार (पिठासाठी)
तूप किंवा तेल – तळण्यासाठी
वेलची पूड – १/२ चमचा
ऑरेंज / पिवळा फूड कलर – चिमूटभर (पर्यायी)
मगज बी किंवा बदाम काप – सजवण्यासाठी
 
कृती:
पीठ भिजवणे: एका भांड्यात बेसन घेऊन त्यात थोडे थोडे पाणी घालून पातळ आणि गुठळ्याविरहित पीठ भिजवून घ्या. (पीठ भजीच्या पिठापेक्षा थोडे पातळ असावे).
बूंदी तळणे: कढईत तूप किंवा तेल गरम करा. नेहमीची झारा वापरून किंवा अगदी सोप्या पद्धतीसाठी प्लास्टिकच्या पिशवीला बारीक छिद्र करून पीठ सोडून बारीक बूंदी मध्यम आचेवर १-२ मिनिटे तळून घ्या. (बूंदी जास्त कडक करू नका).
साखर पाक: दुसऱ्या कढईत साखर आणि पाणी एकत्र करून उकळू द्या. साखर विरघळल्यावर त्यात वेलची पूड आणि फूड कलर घाला. १ ताराचा पाक न करता फक्त हाताला चिकट लागेल असा पाक बनवा.
मिश्रण एकत्र करणे: तयार पाकात तळलेली बूंदी घाला आणि मंद आचेवर १ मिनिट शिजवून घ्या, जेणेकरून बूंदी पाक शोषून घेईल.
लाडू वळणे: गॅस बंद करून झाकण ठेवा. मिश्रण थोडे कोमट झाल्यावर त्यात मगज बी घाला आणि हाताला थोडे तूप लावून मध्यम आकाराचे मऊ मोतीचूर लाडू वळून घ्या.
घरी बनवलेले ताजे, शुद्ध आणि स्वादिष्ट मोतीचूर लाडू तयार आहेत!

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

सकाळच्या नाश्त्यापासून ते दुपारच्या जेवणापर्यंत गाजरापासून बनवा चविष्ट पदार्थ

सावळ्या त्वचेसाठी लिपस्टिकच्या या शेड्स निवडा! तुम्ही अगदी सुंदर दिसाल...

जेव्हा कधी तुम्हाला थोडी भूक लागेल, तेव्हा जंक फूडऐवजी हे आरोग्यदायी पर्याय निवडा

World Television Day 2026: जागतिक टेलिव्हिजन दिनाचा इतिहास जाणून घ्या

अत्यंत गुणकारी ''आवळ्याचे लाडू'' हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उत्तम

पुढील लेख
Show comments