1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
  4. Gulkand and Dry Fruit Besan Ladoo recipe

गणपती बाप्पासाठी खास नैवेद्य ''गुलकंद-ड्रायफ्रूट बेसन लाडू'' नक्की ट्राय करा

पारंपरिक बुंदीच्या लाडूंना उत्तम पर्याय म्हणून बनवता येणारे गुलकंद-ड्रायफ्रूट बेसन लाडू अतिशय चविष्ट आणि दिसायला देखील सुंदर दिसतात.

गुलकंद-ड्रायफ्रूट बेसन लाडू
साहित्य-
बेसन (२ वाट्या)
तूप (१ वाटी)
पिठीसाखर (१ वाटी)
वेलची पूड (१/२ चमचा)
सारणासाठी गुलकंद (३-४ चमचे)
बारीक चिरलेले बदाम-काजू.
कृती-
सर्वात आधी कढईत तूप गरम करून मंद आचेवर बेसन छान खमंग वास येईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत (सुमारे १५-२० मिनिटे) भाजून घ्या. बेसन भाजून झाल्यावर गॅस बंद करा आणि मिश्रण थोडे कोमट होऊ द्या. कोमट मिश्रणात पिठीसाखर आणि वेलची पूड घालून व्यवस्थित एकजीव करा. एका वाटीत गुलकंद आणि चिरलेले ड्रायफ्रूट्स एकत्र मिक्स करून ठेवा. बेसनाचा छोटा गोळा हातावर पसरवून त्यात मध्यभागी थोडे गुलकंदाचे सारण भरा आणि गोल लाडू वळून घ्या.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
ऋषी पंचमी विशेष: पारंपरिक आणि पौष्टिक ऋषींची भाजी Rishi Panchami Naivedyam