मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 मे 2019 (12:34 IST)

मायक्रोवेव्ह स्पेशल : कोको नानकटाई

साहित्य - १00 ग्रॅम मैदा, २0 ग्रॅम कोको पावडर, १00 ग्रॅम पिठीसाखर, ७५ ग्रॅम पांढरे लोणी किंवा वनस्पती तूप, १/२ टी. स्पू. व्हॅनिला इसेन्स, १/४ टी. स्पू. बेकिंग पावडर.

कृती - पिठीसाखर-लोणी/तूप एकत्र करून हलके होईपर्यंत फेटून घ्या. मैद्यात बेकिंग पावडर, कोको पावडर टाकून चाळून घ्या. फेसलेल्या लोणीत चाळलेला मैदा व व्हॅनिला इसेन्स घाला. मिश्रणाचे लहान गोळे करा. ते दाबून जरा चपटे करून बेकिंग ट्रेमध्ये १ इंचाचे अंतर ठेवून मांडा. कन्व्हेक्शनवर मायक्रोवेव्ह प्रि-हीट करून १६0 डिग्रीवर ५ मिनिटे बेक करा.