गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified: गुरूवार, 9 मे 2019 (12:37 IST)

मँगो खोबरा लाडू

साहित्य : आंब्याचा पल्प अर्धा कप, कंडेंस्ड मिल्क अर्धा कप, नारळाचा बुरा एक कप, वेलची पूड एक चमचा, मिक्स ड्राय फ्रूट्स अर्धा कप.
 
कृती : सर्वप्रथम एका जाड भांड्यात नारळाच्या बूर्‍याला भाजून घ्या नंतर त्यात आंब्याचा पल्प घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा. आता यात कंडेंस्ड मिल्क घाला, ड्राय फ्रूट्स व वेलची पूड घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळत राहा.
 
आता या मिश्रणाला थंड करून त्याचे लाडू बांधा. एका प्लेटमध्ये नाळराचा बुरा घेऊन त्यावर या लाडूंना रोल करा. तुमचे मँगो लाडू तयार आहे.