बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Updated : गुरूवार, 10 जानेवारी 2019 (12:23 IST)

रेसिपी : थुली (सांजा)ची बर्फी तोंडात गोडवा आणि आरोग्याच्या दृष्टीने उत्तम

थुली आरोग्यासाठी फारच पौष्‍टिक आहार आहे जे प्रोटीन, विटामिन, फायबर, लोह, फॉस्फोरस, मिनरल्स, पोटॅशियम, मॅग्नीशयम सारख्या पोषक तत्त्वांनी भरपूर आहे. हा लठ्ठपणा कमी करण्यात देखील मदत करतो. आज आम्ही तुम्हाला सोजीच्या वड्या कशा तयार करायच्या हे सांगत आहोत.   
 
साहित्य :
 
150 ग्रॅम थुली 
300 ग्रॅम दूध
100 ग्रॅम तूप  
250 ग्रॅम खवा  
250 ग्रॅम साखर  
15 काजूचे काप  
1 चम्मच चारोळी  
7 कापलेले पिस्ता  
1 चुटकी वेलची पूड  
 
कृती : 
थुलीची वडी बनवण्यासाठी एका पॅनमध्ये तीन चमचे तूप घाला आणि त्यात थुली घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या.   
 
आता ऐका जाडसर कढईत दूध उकळून घ्या. जेव्हा दूधावर उकळी येईल तेव्हा त्यात परतलेली थुली घाला. या मिश्रणाला मध्यम आचेवर हळू हळू दूध आटेपर्यंत हालवत राहा. आता यात खवा, साखर, वेलची पूड, काजू, चारोळी आणि पिस्ता घाला. लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे या थुली आणि दुधाच्या मिश्रणात खवा दूध आटल्यानंतरच घाला, नाही तर याचा स्वाद फिका राहील.
 
आता 15 मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे हे मिश्रण हालवून घ्या आणि नंतर गॅस बंद करा. एका सपाट भांड्यात तूप लावून हे मिश्रण पसरवून घ्या. जेव्हा हे मिश्रण गार होईल तेव्हा याच्या आपल्या आवडीच्या आकारात कापून घ्या. वरून बारीक काप केलेले पिस्ता पसरवा. तुम्ही या वड्यांना एयरटाइट डब्यात एका आठवड्यापर्यंत स्टोअर करू शकता.