सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

घरगुती गॅस झाला स्वस्त

पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती गॅस स्वस्त केला आहे. अनुदानित सिलिंडरचे दर 5.91, तर विनाअनुदानित सिलिंडरचे दर 120.50 रुपयांनी घटविण्यात आले. सोमवारी मध्यरात्रीपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पेट्रोल, डिझेलचे भावसुद्धा वर्षातील नीचांकी पातळीवर आल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
 
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे. या घडामोडींमुळे इंधन आणि एलपीजीचे दर पेट्रोलियम कंपन्यांनी स्वस्त केले आहेत. एलपीजी दरात या महिन्यात दोन वेळा कपात करण्यात आली आहे. या आधी एक डिसेंबर रोजी अनुदानित एलपीजीच्या दरात 6.52, तर विनाअनुदानित गॅसमध्ये 133 रुपयांची कपात करण्यात आली होती. जून महिन्यापासून कंपन्यांनी एकूण सहा वेळा गॅसच्या दरात घट केली आहे. जूनपासून अनुदानित गॅसच्या किमतीमध्ये 14.13 रुपयांनी घसरण झाली आहे.