शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Updated : मंगळवार, 29 नोव्हेंबर 2022 (00:00 IST)

Dinkache Ladoo पौष्टिक डिंकाचे लाडू

laddu
साहित्य : पाव किलो डिंक, अर्धा किलो सुके खोबरे, अर्धा किलो खारीक, एक वाटी खसखस, पाव वाटी बादाम, एक किलो गूळ किंवा साखर, बिब्ब्याच्या बिया, अर्धी वाटी साजूक तूप.
 
कृती : साधारणपणे हरभर्‍याच्या डाळीएवढा बारीक होईल, इतपत डिंक जाडसर कुटावा. नंतर डिंकाला तुपाचा हात लावून तो उन्हात ठेवावा. खोबरे किसून, भाजून घ्यावे. खारकांची पूड करून घ्यावी. खसकस भाजून घ्यावी. बदाम सोलून त्यांचे जाड काप करून घ्यावेत. बिब्ब्याच्या तुपामध्ये तळून त्यांच्या लाह्या करून घ्याव्या. थोडे तूप टाकून खारकांची पूड भाजून घ्यावी. नंतर साखरेचा किंवा गुळाचा पक्का पाक करून, त्यात अर्धी वाटी तूप घालावे. नंतर त्यात डिंक व तयार करून घेतलेले वरील इतर सर्व साहित्य घालावे. चांगले मिसळून घेऊन लाडू वळावे. हे लाडू गरमच वळावे लागतात. हे लाडू उपवासालाही चालतात.