सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified: बुधवार, 27 नोव्हेंबर 2019 (11:57 IST)

खमंग खुसखुशीत कणिक पोह्याचे लाडू

साहित्य
2 वाटी पोहे, 1/2 वाटी कणिक, 3 वाट्या पिठी साखर, वेलची पूड, 300 ग्राम साजूक तुप, बेदाणॆ, चारोळ्या.
 
कृती
सर्वप्रथम कढईमध्ये साजुक तुप घालून पोहे तळून घ्यावे. गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. नंतर तुपात कणिक तांबूस भाजून घ्यावी. पोह्‍याच्या मिश्रणात पीठ मिसळून त्यात पिठी साखर घालावी. वेलची पूड, बेदाणे घालून लाडू बांधावे.