सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified: मंगळवार, 22 सप्टेंबर 2020 (10:17 IST)

अधिक मास रेसिपी : पिवळ्या रंगाच्या या गोड पदार्थाने श्रीविष्णू होतील प्रसन्न

अधिक मास हा श्री विष्णूंचा आवडता महिना आहे. या महिन्यात पिवळ्या रंगाच्या गोड पदार्थांचा नैवेद्य त्यांना दाखविल्यामुळे ते प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. चला तर मग बेसनाचा लाडू करण्याची सोपी पद्धत जाणून घेऊया. 
 
बेसनाचे लाडू कसे बनवायचे
साहित्य - 1 कप जाडसर बेसन (हरभऱ्याच्या डाळीचे पीठ), 1 कप पिठी साखर, 1 चमचा वेलची पूड, 4 -5 मोठा चमचा साजूक तूप, कप सुक्या मेव्याचे बारीक काप, चांदीचा वर्ख(गरजेप्रमाणे), केसर किंवा बदाम.
 
कृती - 1 कप जाडसर बेसन चाळून घ्या.आता 4 ते 5 चमचे साजूक तूप घाला आणि बेसन तांबूस रंगाचे होईपर्यंत ढवळत राहा. लक्षात असू द्या की बेसन करपू देऊ नका. चांगल्या प्रकारे भाजून झाल्यावर ताटलीत थंड होण्यासाठी ठेवा. आता या मध्ये पिठीसाखर ,वेलची पूड आणि सुक्या मेव्याचे काप घालून मिसळून घ्या. हे मिश्रण कोमट झाल्यावर याचे लहान -लहान लाडू वळा आणि चांदीचा वर्ख लावून सर्व्ह करा. आपली इच्छा असल्यास आपण चांदीच्या वर्खच्या जागी केसराचे पान किंवा बदामाचा वापर करू शकता.