Rakhi Special Narali Bhat : नारळी भात (साखरेचा)
साहित्य : 2 वाट्या जुने तांदूळ, 1/2 नारळ, 3 वाट्या साखर, 1/2 वाटी तूप, 5-6 लवंगा, 9-10 बादाम-बी, 7-8 वेलदोडे, पाव वाटी बेदाणे, 1/2 ग्रॅम केशर किंवा खाण्याचा केशरी रंग, 1/2 लिंबू.
कृती : तांदूळ तासभर आधी धुऊन ठेवावे. थोडेसे तूप टाकून गरम तुपावर प्रथम लवंगा परताव्या व नंतर त्यावर तांदूळ परतावेत. तांदळाच्या दुप्पट गरम पाणी त्यावर घालावे. चवीला मीठ व किंचित हळद घालून तो भात मोकळा शिजवावा. शिजल्यावर तो परातीत पसरून मोकळा करावा. एका पातेल्यात साखरेचा गोळीबंद पाक करून घ्यावा.
आवडत असल्यास एका लिंबाचा रस घालावा. तसेच, आवडत असल्यास 1/2 नारळाचे खोवलेले खोबरे घालावे. केशर किंवा रंग घालावा. मग त्यात भात घालून मंद निखार्यावर चांगली वाफ आणून मोकळा होऊ द्यावा. नंतर त्यात बादामाचे काप, बेदाणा, वेलची-पूड टाकावी. वर एक वाटी चांगले तूप सोडावे व एक केळीचे पान वर ठेवून, त्यावर ताट झाकण ठेवावे.