शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified: मंगळवार, 9 ऑगस्ट 2022 (12:29 IST)

Raksha Bandhan Recipe Kalakand रक्षाबंधनाला भावाचे तोंड कलाकंद या मिठाईने गोड करा, फक्त 15 मिनिटात तयार करा

Raksha Bandhan Recipe Kalakand
Kalakand Recipe: रक्षाबंधनाला भावाचे तोंड कलाकंद या मिठाईने गोड करा, फक्त 15 मिनिटात तयार करा
आज आम्ही तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने स्वादिष्ट गोड 'कलाकंद' घरी कसा बनवायचा ते सांगणार आहोत. तुम्ही वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये 'कलाकंद' देखील बनवू शकता. चला जाणून घेऊया 'कलाकंद' बनवण्याची रेसिपी.
 
कलाकंद बनवण्यासाठी सामुग्री-
250 ग्रॅम पनीर
2 मोठे चमचे साखर
1 मोठा चमचा मिल्क पावडर
अर्धा चमचा वेलची पूड
कापलेले पिस्ता
गुलाब पाने
 
कलाकंद बनवण्याची कृती
पनीर मिक्सरमध्ये ब्लेंड करा. आता एक पॅन गरम करा आणि त्यात साखर आणि पनीर टाकून चालवा. 5 मिनिट मध्यम आचेवर हालवत रहा. आता वरुन एक मोठा चमचा मिल्क पावडर टाकून चालवा. 5 मिनिटाने वेलची पावडर टाकून चालवा. आता चांगल्यारीत्या मिक्स झाल्यावर एका ताटात पसरवून घ्या. वरुन पिस्ता आणि गुलबाच्या पानांनी सजवून घ्या. गार झाल्यावर कलाकंद सर्व्ह करा.