शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Updated : सोमवार, 15 जानेवारी 2024 (09:55 IST)

तिळाचे लाडू कडक होणार नाही, 'ही' पद्धत अवलंबवा

tilgud ladoo
मकर संक्राती 2024 - मकर संक्राती हा हिन्दू धर्मातील एक महत्वाचा आणि पारंपारिक सण आहे. हा सण दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला येतो. या दिवशी काळ्या रंगाचे विशेष महत्व असते. म्हणून या दिवशी  काळे कपडे जास्त करून परिधान केले जातात. 

तसेच 'तिळगुळ घ्या; गोड गोड बोला' असे म्हणत  एकमेकांना तिळीचा हलवा  व तिळगुळचे लाडू वाटले जातात  हे तिळगुळचे लाडू काही काळानंतर कडक होतात. हे लाडू कडक होऊ नये या साठी ही पद्धत अवलंबवा.चला तर मग रेसिपी जाणून घेऊ या. 
 साहित्य-
500 ग्रॅम तिळ, 250 ग्रॅम शेंगदाणे, 25 ग्रॅम चण्याची डाळ, 500 ग्रॅम गूळ, 1 टी स्पून वेलची पूड, 1 चमचा साजूक तूप  
 
कृती- 
सर्व प्रथम कढईत तिळ आणि शेंगदाणे वेगवेगळे भाजून घ्यावे. नंतर ते एका ताटात काढून घ्यावे. त्यानंतर कढईत  एक चमचा तूप टाकून त्यात गूळ बारीक करून टाका. तसेच गूळ पूर्ण वितळून घ्यावा. बोटाला गूळ चिकटतो आहे का  हे पहा आणि मग नंतर शेंगदाणे, तिळ, वेलची पूड, भाजून घेतलेली चण्याची डाळ  अदि हे सर्व मिश्रण टाकून हलवून घ्यावे. 

हे मिश्रण एकजीव झाल्यावर ताटात काढून घ्यावे आणि मग तुम्हाला हवा असेल तशे  आकाराचे लाडू वळण्यास सुरूवात  करा. मिश्रण गरम असतानाच लाडू वळले तर पटकन वळले जातात व मऊ देखील होतात.अशा पद्धतीने लाडू केल्यास ते कडक होणार नाही.