कृती : अननसाची साल पूर्णपणे काढून व मधला कठीण भाग काढून टाकून अननसाचे लहान लहान तुकडे किंवा चकत्या कराव्यात. ते तुकडे किंवा चकत्या स्टेनलेस् स्टीलच्या भांड्यात घालून, फोडी बुडेपर्यंत पाणी घालावे व विस्तवावर ठेवून फोडी मऊ होईपर्यंत शिजवावे. शिजवलेल्या फोडी किंवा चकत्या काढून घेऊन, फडक्यावर पसरून कोरड्या कराव्या. नंतर एका भांड्यात पाणी घ्यावे.
त्यात अननसाच्या दुप्पट साखर घालून पक्का पाक करावा. नंतर त्या अननसाचे तुकडे किंवा चकत्या घालून पाक मधाइतपत घट्ट होईपर्यंत शिजवावे. नंतर खाली उतरवून गार झाल्यावर मुरंबा बरणीत भरावा.