साहित्य : 1 वाटी मैदा, 1 वाटी आटा, 1 वाटी दही, पाव वाटी लोणी, 2 अंडी, एक कप सारखरेचा किंवा गुळाचा पाक किंवा मध, चिमटीभर मीठ, 2 चमचे सोडा, बेदाणे.
ND
ND
कृती : आटा व मैदा एकत्र करून, त्यात सोडा व मीठ घालून, सर्व चाळणीतून चाळून घ्यावे. नंतर त्या पिठात लोणी घालून, चांगले कालवून, सारखे करावे. नंतरअंडी फेटून घेऊन ती व दही आणि साखरेचा किंवा गुळाचा पाक किंवा मध वरील पिठात घालून मिश्रण हाताने चांगले कालवून घ्यावे व नंतर डब्यात किंवा केकच्या भांड्यात घालून वर बटरपेपर घालावा. साधारणपणे तीन तास ते भांडे वाफेवर शिजत ठेवावे. विशेष म्हणजे, हा लोफ करण्यास ओव्हनची गरज नसते.