कृती : सर्वप्रथम दुधाला उकळून घ्यावे, नंतर थोड्याशा पाण्यात साखर टाकून त्यात भाजलेला रवा, साबुदाणा व तांदूळ उकळत ठेवावा. अर्धवट शिजल्यानंतर त्यात शेवया टाकाव्या. जेव्हा हे सर्व मिश्रण चांगले शिजून जाईल तेव्हा त्यात दूध टाकावे. काही वेळ ढवळून त्यात सुके मेवे टाकावे. थंड करून त्यात केळी, सफरचंद (लांब लांब किसलेले) टाकावे. ही खीर थंड सर्व्ह करावी.