कृती : प्रथम आंब्याची साले काढून बारीक तुकडे चिरा व साधारण हलक्या हाताने एकदाच कुस्करून ठेवा. दुधात साखर, स्ट्रॉबेरी इसेन्स व कस्टर्ड पावडर टाकून चांगले चोपडे करा व गॅसवर मिश्रणाचे भांडे ठेवून ढवळून दाट करा. गुठळ्या होऊ देऊ नका. मिश्रण थंड झाल्यावर त्यात आंब्याचा गर घालून हलक्या हाताने ढवळा. सर्व सुका मेवा व चेरी टाकून मिसळून भांडे फ्रीजमध्ये ठेवा व चांगले सेट झाल्यावर पुडींग काचेच्या बाऊलमध्ये टाकून सर्व्ह करा.