शनिवार, 31 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By वेबदुनिया|

आरतीचे मोदक

तांदळाची पिठी
साहत्यि: दोन वाट्या तांदळाची पिठी, दोन टीस्पून पातळ तूप, तेल किंवा लोणी, अडीच वाट्या पाणी, चिमुटभर मीठ.

सारणासाठी : तीन वाट्या किसलेलं सुकं खोबरं, एक वाटी बारीक रवा किंवा जाडसर कणीक, पाव वाटी तूप, अडीच वाट्या पिठीसाखर, एक टे.स्पून भाजलेली खसखस, पाव वाटी काजूचे तुकडे किंवा चारोळी, एक टी.स्पून वेलचीपूड.

NDND
कृती : नेहमीप्रमाणे उकडीचा मोदक तयार करावा. फक्त मुखर्‍या एकत्र करून त्याचे कळीदार टोक न करता ते पुन्हा वाटीच्या आकाराने फुलवावे आणि त्यात फुलवात राहील, असं करावं. आरतीच्या वेळी यात फुलवाती ठेवून पेटवाव्यात. अशाच पद्धतीनं तळलेले मोदकही करतात. कारवार भागात विशेषत: चित्रापूर सारस्वतांकडे गणपतीच्या दिवसांत एकदा तरी अशी खास ‘मोदकांची आरती’ केली जाते.
दुग्धमोदक