साहित्य - ५00 ग्रॅम गव्हाचा दलिया, ५00 ग्रॅम गूळ, दोन नारळांचं घट्ट दूध, दोन चमचे खसखस, वेलची पूड आणि तूप.
कृती - दोन चमचे तुपात दलिया थोडा परतून घ्यावा. कुकरमध्ये चार वाटी पाणी मिक्स करून मऊसर शिजवून घ्यावा. पळीनं किंवा रवीनं ठेचून त्यात भाजलेले खसखस, गूळ, नारळाचं दूध घालावं. हे मिश्रण मंद गॅसवर शिजवून घ्यावं. चांगली उकळी आल्यावर त्यात वेलची पूड मिक्स करून गॅस बंद करावा. ही खीर खाण्यास देताना त्यात गाईचं/म्हशीचं दूध गरम करून घालावं.