गाजराचा हलवा
स्वादिष्ट व जीभेवर रेंगाळणारा स्वाद
साहित्य : गाजर अर्धा किलो, 250 ग्रॅम वनस्पती तूप किंवा साजूक तूप, इलायची 10 ग्रॅम, बदाम 100 ग्रॅम, काजू 50 ग्रॅम, साखर 400 ग्रॅम. पूर्वतयारी : गाजर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. गाजरावरील अतिरिक्त साल काढून घ्यावी. गाजर किसून घ्यावे. इलायची बारीक करून घ्यावी. बदाम व काजूचे बारीक तुकडे करावे. कृती : गॅसवर कढई ठेवावी. कढईत वनस्पती तूप किवा साजूक तूप टाकावे. बदाम व काजू तुपात भाजून घ्यावे. काजू व बदाम तुकडे कढईतून प्लेटमध्ये काढावे. वनस्पती तूप किंवा साजूक तुप पाच मिनिटांपर्यत तापवावे. त्यात गाजराचा किस घालून सपाट चमच्याने सारखे परतत रहावे. गॅसची आंच मंद ठेवावी. साधारणत 30-35 मिनिटांपर्यत गाजराचा किस तूपात भाजत रहायचा. गाजर किसातील संपूर्ण पाणी आटणार नाही याची काळजी घ्यावी. तूपात भाजलेल्या गाजर किसात बदाम व काजूचे तुकडे टाकावे. इलायची टाकावी. संपूर्ण मिश्रण एकत्र करावे. यात साखर घालून परतून मिश्रण परतून घ्यावे. संपूर्ण मिश्रण कोरडे होईपर्यंत चमच्याने परतत रहावे. तयार गाजराचा हलवा प्लेटमध्ये घेऊन वरून खोबर्याच्या किस टाकून सजवावा.