शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By वेबदुनिया|

चिकू तांदूळ खीर

WD
साहित्य : तीन कप दूध, पाच चमचे साखर, दोन चमचे तांदूळ, दोन चमचे चिकूंचा पल्प, चार चमचे भाजलेले अक्रोड, अर्धा चमचा तूप.

कृती : सर्वप्रथम पॅनमध्ये तूप घ्या. त्यात तांदूळ धुऊन घाला. थोडे परता. नंतर त्यात तीन कप दूध आटवून दोन कप करा. कहा मिनिटे उकळवा. तांदूळ शिजले, की त्यात साखर व रोस्टेड अक्रोड घाला. गॅस बंद करा व मिश्रर थंड करा. मग त्यात चिकूचा पल्प घाला व मिक्स करा. वर थोडे अक्रोडचे तुकडे घाला व थंड करून सर्व्ह करा.