शुक्रवार, 30 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By सौ. सरोज लेले|

चेरी केक

मैदा
साहित्य : 3 वाट्या मैदा, 2 वाट्या साखर, 3 अंडी, 1 वाटी लोणी, पाव चमचा मीठ, 2 सपाट चमचे बेकिंग पावडर, लिंबाची किसलेली साल, 1 सपाट वाटी चेरीची फळे, भिजविण्यापुरते दूध.

NDND
कृती: साखर आणि लोणी एकत्र फेसून घ्यावे. नंतर त्यात अंड्यातील बलक घालून मिश्रण सारखे करावे. मैदा, मीठ आणि बेकिंग पावडर एकत्र मिसळून, चाळून घ्यावे. त्यात लिंबाची किसलेली साल घालावी व हे पीठ लोणी, साखर व अंडी यांच्या तयार करून घेतलेले मिश्रणात घालून हलक्या हाताने कालवावे. चेरीची फळे अर्धी कापून, त्या तुकड्यांना थोडास मैदा लावून, ते तुकडे वरील तयार मिश्रणात घालावेत व पुरेसे दूध घालून पीठ भिजवावे व सैलसर गोळा तयार करून घ्यावा. केकच्या भांड्याला आतून तुपाचा हात लावून वरीलप्रमाणे तयार केलेले पीठ त्या भांड्यात घालावे व भांडे ओव्हनमध्ये ठेवून मंद आचेवर केक भाजून घ्यावा.