शनिवार, 31 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By वेबदुनिया|

चॉकलेट पुडिंग

- प्रीता गडकरी

चॉकलेट पुडिंग
साहित्य : 1/2 लिटर दूध, 25 ‍‍ग्रॅम कुकिंग चॉकलेट, 60 ग्रॉ. लोणी. 3 अण्डी, 3 चमचे कॉनफ्लोअर, 100 ग्रॉम साखर, 2 वाट्या पाणी.

NDND
कृती : दूध गरम करून घ्याव. दूध थंड झाल्यावर त्यात चॉकलेट, साखर, कॉर्नफ्लोअर आणि थोडे पाणि घालून तैयार केलेला सॉस, थंड दूधात मिसळावे. चांगले फेटून घ्यावे. अण्डी फोडून त्यांतील बलंक थोडा-थोडा त्यात घालावा. भांड्याला लोणीचा हात लावून, त्यात ते मिश्रण ओतावे.

भांडे कुकरमध्ये ठेवून त्याला घट्ट झाकण लावावे, कुकर बंद करून मिश्रण शिजवून घ्यावे. व्यवस्थित शिजल्यावर कुकर खोलून, आतले भांडे काढून गार करण्यास ठेवावे, थंड झाल्यावर पुडिंग सर्व्ह करावे.