- लाईफस्टाईल
» - खाद्य संस्कृती
» - गोडधोड
झटपट लाडु (बीन तुपाचे)
साहित्य : १ वाटी खवा,१ वाटी रवा,१ वाटी खोबरे (ओले किंवा सुके) २ वाटी पिठीसाखर, बेदाणे, काजु, पिस्ता, बदाम, वेलची, जायफळ पावडर २ चमचे कृती : खवा, रवा, खोबरे हे सर्व मिक्स करा. हे मिश्रण कुकरच्या भांड्यात घाला. कुकरमध्ये ३ शिट्ट्या करा. जर का खोबरे ओले असेल तर भांडयावर झाकण ठेवा, सुके खोबरे असेल तर भांड उघडे ठेवा व शिट्टी काढा. हे मिश्रण गार करा. नंतर यात 2 वाटी पिठीसाखर घालून सर्व सुका मेवा मिक्स करा. जायफळ, वेलदोड्याची पुड थोडी जास्त घाला. यानंतर याचे लाडु बांधा. मिश्रण जास्त गार झाले तर दुधाचा हात लावुन लाडु वळा.