साहित्य : नारळाचे दूध एक वाटी, साखर एक वाटी, दूध दोन वाट्या.
कृती : नारळाचे दूध घ्यावयाचे, ते नारळाच्या चवात पाणी न घालता काढलेले दूध घ्यावे. ते नारळाचे दूध, साखर व साधे दूध एकत्र करून शिजत ठेवावे. िशजत असताना त्याचा थेंब पाण्यात टाकून बघावे. थेंबाची गोळी झाली, की शिजले, असे समजावे व खाली उतरवून घ्यावे. ताटाला तूप लावून त्यावर ओतावे व लहान लहान चौकोनी वड्या कापाव्यात.