शुक्रवार, 30 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By वेबदुनिया|

डाळीचे समोसे

डाळीचे समोसे
WD
साहित्य : 1 कप मैदा, 4 मोठे चमचे तूप.

सारणासाठी साहित्य :
1 कप भिजलेली चण्याची डाळ, 1/4 कप साखर, 2 मोठे चमचे मनुका, 2 मोठे चमचे बदाम बारीक काप केलेले,
2 मोठे चमचे काजू बारीक काप केलेले, 1 कप साखर चाशनीसाठी, तळण्यासाठी तेल.

कृती :
सर्वप्रथम मैद्यात मोहन घालून पीठ भिजवून ठेवावे. नंतर लिंबा एवढी गोळी घेऊन पातळ पातळ लाटून घ्यावी. आता सारण भरण्यासाठी चण्याची डाळ वाटून घ्यावी. या पेस्टमध्ये साखर व इतर मेवा घालून सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यावे. आता लाटलेल्या पुरीला मधून अर्धे काप करावे. अर्धी कापलेली पुरीला समोसा सारखा आकार देऊन त्यात तयार केलेले सारण भरून त्याला तळून घ्यावे. नंतर साखरेत अर्धा कप पाण घालून चाशनी तयार करावी व ती थंड झाल्यावर तयार सोमेसे त्यात टाकून लगेचच काढावे.