तिळाची पुरणपोळी
साहित्य: 1 वाटी भाजलेले तिळ, 1/2 वाटी मावा, 1 वाटी साखर, 250 ग्रॅ. मैदा, सुका मेवा चवीनुसार, तळण्यासाठी तेल.
कृती: सर्वप्रथम मावा परतून घ्यावा. तिळाचे कूट तयार करावे. माव्यात साखर, तिळाचे कूट आणि बारीक काप केलेला सुका मेवा घालून सारण तयार करावे. मैद्यात तुपाचा मोहन घालून दुधाने कणीक मळून त्यात कचोरीप्रमाणे सारण भरून गुलाबी होईपर्यंत तळावे किंवा ओव्हनमध्ये बेक करून घ्यावे.