शुक्रवार, 30 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By वेबदुनिया|

तिळाची पूरणपोळी

तिळाची पूरणपोळी
साहित्य-- 1/2 किलो मैदा, 250 ग्रॅम तीळ, 100 ग्रॅम मावा, 1/2 किलो साखर, सुका मेवा इच्छेनुसार, तळण्यासाठी तेल.

NDND
कृती-- तीळ साफ करून कमी आचेवर भाजून घ्या. तीळ चांगले भाजले गेल्यावर गँसवरून उतरवून बारीक कुटून घ्या. मावा चांगला भाजून घ्या. हा मावा, तीळ, साखर व बारीक काप केलेला सुका मेवा एकत्र करून घ्या.

मैद्यात तुपाचे मोहन टाकून दूध घालून मळून घ्या. आता मैद्याच्या मिश्रणाचे लहान लहान गोळे घेऊन हातावर चपटा करून तिळाचे मिश्रण भरून व्यवस्थित बंद करून घ्या. आता हलक्या हाताने लाटून गरम तुपात तळून घ्या. या पध्दतीने सगळ्या पूरणपोळ्या तयार करा.