साहित्य : चांगल्या पपईचा कुस्करून घेतलेला गर 2 वाट्या व साखर पाऊण वाटी, वेलदोडे. कृती : पिकलेल्या पपईचा कुस्करून घेतलेला गर दोन वाट्या घेऊन व साखर घेऊन दोन्ही एकत्र शिजवावे. गोळा झाल्यावर वेलदोड्यांची पूड घालून, ताटाला तुपाचा हात लावून, त्यावर गोळा लाटावा व वड्या कापाव्या.