साहित्य : बटाटे, साखर, वेलदोडे, नारळ. कृती : बटाटे उकळून, ते पुरण वाटावयाच्या यंत्रातून वाटून घ्यावेत. याप्रमाणे वाटलेला गोळा दोन वाट्या, साखर तीन वाट्या, अर्ध्या नारळाचे खोवलेले खोबरे असे सर्व एकत्र करून शिजत ठेवावे. घट्ट गोळा होईपर्यंत शिजवावे व नंतर खाली उतरवून चांगले घोटावे. वेलदोड्यांची पूड घालावी. पोळपाटास तुपाचा हात लावून, त्यावर लाटून वड्या कापाव्यात.