1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By वेबदुनिया|

बदामाची बर्फी

ND
साहित्य : दोन वाट्या बदाम बी, दीड वाटी साखर, तूप, दहा-बारा वेलदोडे, मावा.
कृती : बदाम भिजत घालून, सोलून, पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये बारीक वाटावेत. नंतर वाटलेला गोळा तुपावर भाजावा. साखरेचा दोन-तारी पाक करून त्यात बदामाचा वाटलेला गोळा व खवा घालून शिजवावे व चांगली गोळी झाल्यावर खाली उतरवून चांगले घोटावे. वेलदोड्याची पूड घालावी व पोळपाटाळा तुपाचा हात लावून, गोळा लाटून वड्या कापाव्यात.