शनिवार, 31 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By वेबदुनिया|

बालूशाही

बालूशाही
साहित्य : 2 वाट्या मैदा, 1/2 वाटी तूप, 1/2 वाटी आंबट दही, अर्धी चिमटी सोडा, पाकाकरिता साखर व तळण्या‍करिता तूप.

NDND
कृती : मैद्यात अर्धी वाटी तूप, दही व सोडा घालून मैदा पाण्यात भिजवावा. अर्ध्या तासानंतर त्याच्या लहानशा लाडवाएवढ्या गोळ्या करून, त्या हाताने पेढ्यासारख्या चपट्या करून घ्यावा. नंतर त्या गोळ्या तुपात तांबूस रंगावर मंद तळून काढाव्यात. नंतर साखरेचा पक्का पाक करून, त्यात त्या तळलेल्या गोळ्या घालून, चार-पाच मिनिटे ठेवाव्या व ताटाला तुपाचा हात लावून त्यात त्या काढून घ्याव्यात. पाक सुकला, म्हणजे बालूशाही तयार झाली.