1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By वेबदुनिया|

ब्रेडचे शंकरपाळे

- स्मिता

ND
साहित्य : दीट वाटी मैदा, अर्धी वाटी रवा, 7-8 ब्रेडच्या स्लायसेस, पाऊण वाटी साखर, अर्धी वाटी दूध, दळण्यास तूप.

कृती : ब्रेडच्या स्लाईसेसच्या कडा काढून त्याचा बारीक चुरा करावा. दुधात साखर मिसळावी. मैदा, रवा व ब्रेडचा चुरा एकत्र करून साखर मिश्रीत दुधाने भिजवावे. गोळा आसट झाल्यास किंवा साखर कमी गोड झाल्यास त्या गोळ्यात पिठी साखर व ब्रेडच्या कडा काढलेल्या 2-3 स्लायसेस बारीक करून मिसळता येतात. गोळा कणकेच्या गोळ्याइतपत घट्ट भिजवावा. 2-3 तास मुरल्यावर त्याचे शंकरपाळे करावे व गरम तुपात मंदाग्नीवर तळावेत हे शंकरपाळे फारच खुसखुशीत व चवदार होतात. आतून स्पंजी झाल्यामुळे वयस्कर लोकांनाही खाता येतात.