रविवार, 1 फेब्रुवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By वेबदुनिया|

भोपळ्याची खीर

भोपळ्याची खीर
WD
साहित्य- पाव किलो लाल भोपळा, १ लिटर दूध, १ चमचा तूप, १/२ चमचे कणिक, साखर अंदाजे किंवा आवडीप्रमाणे, काजू, बदाम, पिस्ते यांचे काप, वेलची पावडर, केशर.

कृती- प्रथम भोपळा किसून घेणे, त्याला १ ते २ चमचे कणिक लावून प्रेशर कुकरमध्ये ३ शिट्टय़ा काढणे, थंड झाल्यावर त्यात दूध घालून गॅसवर ठेवणे, साखर घालणे, वेलची पावडर घालणे, भोपळा लालसर असल्यास केशर घालायची गरज नाही. खीर उकळी येईपर्यंत ढवळत राहणे, खाली लागता कामा नये. आवडीप्रमाणे काजू, बदाम व पिस्ते काप घालणे, बेदाणे घालणे, चवीला खूप छान लागते.