साहित्य : 3 कप दह्याचा चक्का, 3 आंबे, 200 ग्रॅम साखर, केशर, वेलची पावडर, बारीक काप केलेले बदाम-पिस्ता, गुलाबाच्या पाकळ्या विधी : एका आंब्याला सोलून त्याच्या बारीक-बारीक फोडी कराव्या, 2 आंब्याच्या रसात अर्धाकप साखर टाकून मिक्सरमधून काढून एकजीव करावे. चक्क्यात उरलेली साखर टाकून गाळणीतून गाळून घ्यावे. आंबाच्या मिश्रणालासुद्धा गाळून घ्यावे, मग दोघांना मिसळून त्यात वेलची पावडर व आंब्याच्या फोडी टाकून फ्रीज मध्ये थंड करण्यासाठी ठेवावे. सर्व्ह करताना ग्लासमध्ये टाकून बदाम-पिस्ता व गुलाबाच्या पाकळ्यानी सजवावे.