बुधवार, 28 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By वेबदुनिया|

मँगो पायस

मँगो पायस
ND
साहित्य : 1 पॅकेट शेवया, 2 लीटर दूध, केशर अंदाजे, 100 ग्रॅम सुके मेवे, 250 ग्रॅम साखर, 250 साय, 2 किलो पिकलेले आंबे, 1 मोठा चमचा तूप.

विधी : शेवयांना तुपात तांबूस होईपर्यंत भाजून घ्यावे. मेव्याचे लहान लहान काप करावे. पिकलेल्या आंब्याचा रस मिक्सरमधून काढून घ्यावा. केसरला थोड्याशा दुधात भिजवून घ्यावे. दोन आंब्याचे लहान लहान काप करावे. दुधाला उकळी आणून थोडं घट्ट करून त्यात शेवया टाकून चांगले हालवावे व त्यात साखर आणि केसर टाकावे. थंड झाल्यावर आंब्याचा रस त्यात टाकावा. फ्रीजमध्ये ठेवावे. सर्व्ह करताना आधी वाटीत शेवया ठेवून त्यावर मेवा, आंब्याचे काप नंतर साय टाकावी.